पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, 13 दिवसांत 8 रुपयांची दरवाढ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशातील इंधन दरवाढीचा भडका कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहेत. 22 मार्चपासून आत्तापर्यंत म्हणजेच 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महागलं आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर 80 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 118.41 रुपये प्रतिलीटर आणि डिझेल 102.64 रुपये प्रतिलीटर झालं आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 103.41 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 94.67 रुपये प्रतिलीटर आहे.
13 दिवसांत 11 वेळा वाढले भाव
गेल्या 13 दिवसांत म्हणजेच 22 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 वेळा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही, त्यामुळे देशभरातील किमती स्थिर होत्या.