भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

पेट्रोल, डिझेलचा भडका ; आठवड्याभरात पाचव्यांदा दरवाढ

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये तब्बल पाचवेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 50 पैशांची तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 99.11 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 113.88 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 97.55 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर
आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 50 पैशांची तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 113.88 तर डिझेल 97.55 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 113.37 आणि डिझेल 98.35 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 96.20 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 112.87 आणि 95.64 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 113.06 रुपये लिटर आणि डिझेल 95.85 रुपये लिटर इतके आहे.

या राज्यात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा अधिक महाग
गेल्या सहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये पाच वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या सहा दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल चार रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!