भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलचे भाव ३ ते ५ रुपयांनी कमी होणार!

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। भारतामध्ये लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे देशातही इंधनाचे दर कमी व्हायचे संकेत मिळत आहेत. बुधवारी क्रुड ऑईल सहा महिन्यांच्या निच्चांकी दरावर येऊन पोहोचलं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये जवळपास ४ टक्क्यांची घट झाली आहे. ब्रेंट क्रुड ऑईल LCOc1 फ्यूचर्स ३.७६ डॉलर म्हणजेच ३.७ टक्के घसरणीसह ९६.७८ बॅरलवर आलं. २१ फेब्रुवारीनंतरची ही निच्चांकी किंमत आहे.

WTI मध्येही घसरण
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रुड CLc1 फ्यूचर्स ३.७६ डॉलर म्हणजेच ४ टक्के कमी होऊन ९०.६६ डॉलरवर येऊन ठेपलं. १० फेब्रुवारीनंतरचा हा निच्चांकी दर आहे. एवढच नाही तर गॅसोलिनची मागणीही कमी झाली आहे.

भारत कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. भारताला गरजेच्या ८५ टक्के इंधन बाहेरून विकत घ्यावं लागतं, ज्याच्याबदल्यात डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात, त्यामुळे कच्चं तेल महागलं आणि डॉलर मजबूत झाला तर देशात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतात. तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाचे भाव एक डॉलरने वाढले तर देशात पेट्रोल-डिझेलचे दर ५०-६० पैसे वाढतात.

तज्ज्ञांच्या मते मागच्या तीन महिन्यांमध्ये MCX मध्ये तेलाची किंमत १८ टक्के कमी झाली आहे. मार्च २०२२ मध्ये क्रुड ऑईलने १३९ डॉलर प्रती बॅरलचा उच्चांक गाठला होता. आता किंमतीमध्ये आलेली ही घट भारतासारख्या आयात करणाऱ्या देशाला फायदेशीर आहे. या घसरणीमुळे भारतात लवकरच पेट्रोल-डिझेलचे भाव ३ ते ५ रुपयांनी कमी व्हायची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!