पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही, दरां बाबत पेट्रोलियम मंत्र्यांच मोठे वक्तव्य
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याचे मानले जात आहे. पण पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारने 21 मे रोजी शेवटच्या वेळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
पेट्रोल-डिझेल आता स्वस्त होणार नाही
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अद्याप कोणताही दिलासा मिळाला नसल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. कच्च्या तेलाच्या (crude oil) दरांत मोठी घट झाली असली तरी भारतीय ऑईल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करणार नाहीत, असे हरदिप सिंग पुरी म्हणालेत.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी यांना माध्यमांद्वारे एक प्रश्न विचारण्यात आला होता. मागल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरांत घट होऊ शकते काय? त्याचं उत्तर देत हरदीप पुरी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहे?
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.93 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर