शरद पवारांना ट्विट वर जीवे मारण्याची धमकी देणारा फार्मसीचा विद्यार्थी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.या तरुणाचे नाव निखिल भामरे असून या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या तरुणाच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे.
निखिल भामरे हा मूळचा सटाण्याचा आहे. तो सध्या दिंडोरी तालुक्यातील वरवंडी इथं बी फार्मसीचं शिक्षण घेत आहे. भामरे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने शरद पवारांविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण दिंडोरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तो बागलाणकर या नावाने आक्षेपार्ह ट्विट करत होता.
निखिल भामरे नावाच्या एका फार्मसीच्या तरुणानं बागलाणकर या युजरनेमचा वापर करून आक्षेपार्ह ट्विट होतं. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचाकाकामाफी_माग.” या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.