महाराष्ट्रराजकीय

राज्यात पुन्हा राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’, १५ आमदार पक्ष सोडणार!

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, तर ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, पण या अधिवेशनाआधीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय सर्जिकल स्ट्राईक होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार बच्चू कडू यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. येत्या १५ दिवसांमध्ये १०-१५ आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

२०-२५ आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण राहील. ‘सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे.सरकार कार्यकाळ पूर्ण करेल’, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

‘इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याचं कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे. १० ते १५ आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदारच नाही राहिले, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल’, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!