अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील
व्हिडीओ दाखवत शिक्षकाचा कारनामा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकच खाजगी शिकवणीत अश्लील व्हिडीओ दाखऊन अश्लिल चाळे करत तिचा वारंवार विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल यादव याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या स्वानंद इमारतीत एका खासगी शिकवणीत शिकवणारा शिक्षक राहुल यादव हा अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवणी संपल्यानंतर देखील जबरदस्तीने थांबवून बोलण्याच्या बहाण्याने तिला स्पर्श करायचा.तिला मोबाइलमधील अश्लील चित्रफिती दाखवायचा. तसंच तिला व्हिडीओत दाखवल्यानुसार आपल्याला असे करायचे आहे असे सांगायचा. कोणाला सांगितले तर ठार मारण्याची दिली धमकी द्यायचा,
विद्यार्थिनीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता या आधी देखील तुला स्पर्श करतानाचे व्हिडीओ माझ्या मोबाइलमध्ये आहेत. हे व्हिडीओ तुझ्या घरच्यांना पाठवीन ,आशा अखेर गेल्या दोन वर्षांपासून होणाऱ्या या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने घरच्यांना याची माहिती दिल्याने घरच्यांनी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर पोलिसांनी राहुल यादव या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.