भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयसामाजिक

मुस्लिम राष्ट्रात स्वामीनारायण संस्थेने उभारलेल्या ‘वैश्विक सद्भाव’ हिंदू मंदिराचे उद्धघाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। मुस्लिम राष्ट्र असलेल्या संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये भव्य मंदिर उभे राहिले आहे. २७ एकर परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या मंदिराचे उद्धघाटन करणार आहेत. यावेळी त्यांनी भव्य सभाही होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी भारतीय अधिकारी कामाला लागले आहेत. बीएपीएस स्वामीनारायण संस्थानकडून हे मंदिर उभारण्यात आले आहे.

२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा पायभारणी समारंभ झाला होता. २७ एकरमध्ये पसरलेल्या हे मंदिर ‘वैश्विक सद्भाव’ म्हणून ओळखले जाणार आहे. २०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अबू धाबी दौऱ्यावर आले होते, त्यावेळी मंदिरास जमीन देण्याचे आश्वासन युएई सरकारने दिले होते. आता २७ एकर जमिनीवर गुलाबी बलुआ दगड आणि सफेद संगमरमरचा वापर करुन मंदिर उभारले गेले आहे. ५५,००० वर्ग मीटरमध्ये हे मंदिर झाले आहे.

BAPS स्वामीनारायण संस्थेने उभारले मंदिर
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ फेब्रुवारी रोजी अबू धाबीमधील शेख जायद स्टेडियममध्ये भारतीय जनसमुदायासाठी सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी UAE ची राजधानी दुबईत BAPS स्वामीनारायण संस्थानकडून उभारण्यात आलेल्या मंदिराचे उद्धघाटन करणार आहे. यासंदर्भात BAPS स्वामीनारायण संस्थेकडून प्रेस रिलीज दिले गेले आहे. त्यात म्हटले आहे की, “धार्मिक परिसराच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. परम पावन महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मंदिराचे उद्घाटन करणार आहे. परंतु पंतप्रधानांच्या युएईमधील कार्यक्रमाची अजून अधिकृत घोषणा झाली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!