आम्ही टॉपर विद्यार्थी घडवतो..अशा खोट्या जाहिराती करणाऱ्या कोचिंग क्लासवर होणार कारवाई
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क/ खासगी कोचिंग क्लासेससाठी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने
नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या. यामध्ये १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे सांगण्यात आले होते. अशात आता खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर देखील आता कारवाई केली जाणार आहे.
या बाबत ग्राहक संरक्षण नियामकांनी सूचना मागविल्या आहेत.आम्ही टॉपर घडवतो, देशातील टॉपर हा आमचाच विद्यार्थी, आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण असे भ्रामक दावे करत अनेक कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. मात्र, आता अशा खोट्या जाहिराती केल्यास क्लास चालकांवर ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
ग्राहक संरक्षण नियामकांनी (सीसीपीए) खासगी शिकवणी संदर्भातील मसुद्यावर हरकती मागवल्यात. या क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर नागरिक १६ मार्च पर्यंत सूचना व हरकती पाठवू शकतात.
काय आहेत केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स?
पदवी नसलेल्या शिक्षकांची कोणत्याही कोचिंग क्लासेसला नियुक्ती करता येणार नाही.
कोचिंग क्लासेस पालकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी किंवा चांगली रँक मिळवून देण्याची किंवा चांगल्या गुणांची हमी देण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत.
क्लासेस १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत.
१६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास कारवाई होईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा