” या ” देशात बलात्कार करणारास नपुंसक करण्याची शिक्षा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बलात्कार हा गंभीर गुन्हा आहे आणि वेगवेगळ्या देशात या बलात्काराच्या विरोधात वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात. काही देशात जन्मठेप तर काही ठिकाणी मृत्यूदंडही दिला जातो. अशात दक्षिण अमेरिकेतील एका देशाने एक विधेयक आणले आहे जे बलात्कार करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. पेरु या देशाने अल्पवयीनवर बलात्कार करणाऱ्या लोकांना नपुंसक करण्याचा निर्णय घेतलाय. पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी ही घोषणा केली.
3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पेरु देशात संतापाची लाट उसळली आहे. यावर विचार करत कॅस्टिलो यांनी एका ३ वर्षाच्या मुलीच्या केसचा उल्लेख करत बलात्काऱ्यांना नपुसंक बनवण्यासाठी केमिकल औषधांचा वापर केला जाईल. असे विधेयक आणणार असल्याचे सांगितले. अशी शिक्षा दक्षिण कोरिया, पोलॅंड, आणि संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये लागू आहे. त्यामुळे असं करणारा पेरु हा पहिला देश नाही.सध्या पेरूमध्ये बलात्काऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते.
या महिन्याच्या सुरुवातीला देशात 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या संशयावरून एका 48 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे.या संदर्भातील विधेयकावर कॅस्टिलो या कॉंग्रेसच्या समर्थनाची वाट बघत आहेत. ज्यानंतर हे विधेयक पास करण्यासाठी पाठवलं जाईल. सध्या तरी पेरू लिब्रेच्या कॉंग्रेस महिला आणि कॉंग्रेस महिला आयोगाच्या अध्यक्षा एलिजाबेथ मदीना यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलंय.