भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पावसाचा हाहाकार; पुन्हा विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रविवारी (काल) दुपारनंतर राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांतील नागरिकांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्याचबरोबर मुंबईत पुढच्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

पावसाचा रेड अलर्ट – पुणे पुणे जिल्ह्याला काल सायंकाळी जोरदार पावसाने झोडपल्याने पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून कोकण आणि विदर्भासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, कालच्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले होते. त्याचबरोबर पावसामुळे अडकून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. जोरदार पावसामुळे पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर येणाऱ्या ४ ते ५ दिवसांत मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे सतर्कतेचे अवाहन करण्यात आले आहे.


पावसाचा ऑरेंज अलर्ट – कोकण, विदर्भ
दरम्यान, अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पूर आला असून शहरातील काही भागातील घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर पाण्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती. राज्यात अनेक ठिकाणी वीजा कोसळल्याच्या, झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पुरामध्ये महिला वाहून गेल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!