भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी पाऊस तर .. …… हवामान खात्याचा इशारा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या राज्यात तापमानात वाढ झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे तर रात्री काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे.
या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त होताना दिसत आहेत. यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुढील पाच दिवस कुठे उन तर कुठे अवकाळी
राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता, तापमानात दोन ते तीन अंशाची घट होणार दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीची देखील शक्यता आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. तर कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची घट पुढील चार दिवस बघायला मिळेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

तापमानातही वाढ
देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत.

प्रशासनाचं आवाहन
परभणीसह राज्याच्या इतरही भागात उन्हाचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव सह काही जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं तिथे नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यातही उन्हाचा कडाका कायम आहे. या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!