भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाऊसपाणी : दोन दिवसांत राज्यात मान्सून सक्रीय, ‘या’ भागात मेघगर्जनांसह पाऊस पडणार

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। राज्यात मान्सूनने धमकदार हजेरी लावत गोव्यासह कोकणातील काही भागात मान्सूनला सुरूवात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपले. मुंबई, पुणे, जळगाव,सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याने राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून पाउस येण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मॉन्सून कोकणात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आजपासून जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच तळ कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून तापमानाचा पाराही घसरला आहे.

मान्सून दक्षिण उत्तर प्रदेशपासून पश्चिम आसामपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस होणार आहे. मध्य प्रदेशपासून आंध्रच्या किनारपट्टीपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टीलगत अरबी समुद्रसापाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!