महाराष्ट्र

मोठी बातमी ; राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मागच्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा बरसण्याची शक्यता आहे. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यासह देशात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान काल झालेल्या पावसाने दसरा सनात व्यत्यय आला. महाराष्ट्रातील काही भागात पावसाने हजेरी लावली. तर पुढच्या काही दिवसांत पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या  पावसामुळे आता हवामानातही बदल दिसून येत आहे. दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय.उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढचे चार दिवस सक्रीय राहणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा यासह अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये 6-7 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे विभागाने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलाय. लोकांनी 8 ऑक्टोबरपर्यंत उत्तराखंडच्या डोंगराळ भागात जाण्यापासून मनाई केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये बुधवारपासून परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून परतीचा प्रवास करणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भासह मराठवाड्यावा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा यलो अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!