भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

यंदा महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढणार; सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस कोसळणार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अलीकडे वाढलेल्या उष्म्यामागे हवामान बदल हेदेखील एक कारण आहे. निसर्गावर मनुष्याने केलेल्या आक्रमणाचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. मनुष्याला या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागत आहे. किंबहुना नजीकच्या भविष्यात या परिणामांची तीव्रता आणखी वाढण्याची भीती आहे. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आपल्या अहवालांतून हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर प्रकाशझोत टाकला आहे. याचदरम्यान महाराष्ट्रावर या हवामान बदलाची कृपा दिसणार आहे. ही कृपा वारुणराजां च्या धारेतून आनंदाचा वर्षाव करणार आहे. ही खुशखबर म्हणजे वरुणराजाचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढणार आहे. अर्थात राज्याच्या सर्वच जिल्ह्यांत पावसाचे दिवस वाढणार आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘आयपीसीसी’च्या अहवालात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. चला तर मग याठिकाणी आपण अभ्यासकांनी नोंदवलेल्या निष्कर्षांचा विस्ताराने आढावा घेऊया.

पावसाळी हंगामात 3 ते 9 दिवसांची वाढ हाेणार
गेल्या काही वर्षांत देशातील सर्वच प्रमुख महानगरांत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे 2050 पर्यंत उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. असे असली तरी देशात राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रात पावसाळी हंगामात 3 ते 9 दिवसांची वाढ हाेणार आहे. अर्थात पावसाचा मुक्काम इतक्या दिवसांनी वाढणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढणार आहे. बहुतांश दिवसांत धो-धो पाऊस कोसळून काही दिवसांतच पावसाची सरासरी ओलांडणार आहे. सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी या संशोधन संस्थेच्या अहवालात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. हा अभ्यास करताना अभ्यासकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. हवामान बदलाचा सकारात्मक परिणाम या आढाव्यातून दिसला आहे. आयपीसीसी, भारतीय हवामान विभाग आणि जागतिक हवामान अभ्यासक संस्थांनीही 1990 ते 2019 या 30 वर्षात बदललेल्या हवामानाचा अभ्यास केला आहे. त्या आधारे 2050 पर्यंतचे अनुमान मांडण्यात आले आहे.

कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढून पावसाचा मुक्काम वाढणार
महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम वाढण्यामागे प्रदूषणाची अर्थात कार्बन उत्सर्जनाची वाढती तीव्रता प्रमुख कारण असेल. जर कार्बन उत्सर्जनाची पातळी सध्याच्या प्रमाणापेक्षा वाढली, तर त्याचा सकारात्मक परिणाम पावसाळी हंगामात दिसून येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाऊस जास्तीत जास्त दिवसांनी वाढणार आहे. ह्या पावसाचे जिल्हावार वेगवेगळे असेल. वाशिममध्ये 9, जालना जिल्ह्यात 8, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, सातारा, नंदूरबार या जिल्ह्यांत 7 दिवस, नागपूर, अकोला, बुलडाणा, पुणे, सांगली, वर्धा या जिल्ह्यांत 5 दिवस तसेच उर्वरित जिल्ह्यात 2 ते 4 दिवसांनी पावसाचा मुक्काम वाढणार आहे. महाराष्ट्राची राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत एका आठवड्याने पावसाचा मुक्काम वाढलेला असेल. चंद्रपूर, अहमदनगर, गडचिरोली, जालना, सातारा या जिल्ह्यांत अतिरिक्त 6 दिवसांची पाऊसकृपा होणार आहे.

सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस कोसळणार
हवामान बदलामुळे पावसाची सरासरी वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी पावसाचे प्रमाण 1 ते 29 टक्क्यांनी वाढणार असल्याचे भाकीत हवामान अभ्यासकांनी केले आहे. तसेच गोंदियामध्ये 1 टक्के तर पुण्यात 29 टक्क्यांनी पाऊस वाढेल. प्रदूषण जर अत्याधिक पातळीच्या पुढे गेले तर गोंदियातील पावसाचे प्रमाण 3 टक्के आणि पुणे जिल्ह्यांत 34 टक्के तर चंद्रपूर जिल्ह्यांत 15 टक्क्यांनी वाढणार आहे. अकोला, भंडारा, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची सरासरी तुलनेत फार अधिक असेल. तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे कमी काळात अधिक पाऊस होणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. मात्र काहीवेळेला पाऊस अविश्रांत सुरु राहिला तर पिकाची नासाडीही होऊ शकते, असे निरीक्षण हवामान अभ्यासकांनी नोंदवले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!