भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज ठाकरे इफेक्ट, अनधिकृत भोंग्यांवर कारवाई होणार! गृह खाते अलर्ट मोडवर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी करून दाखवलं, असं म्हणण्याची वेळ आता आलीय. त्याला कारण म्हणजे राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सामाजिक वातावरण गढूळ होऊ नये म्हणून सध्या भोंग्यांवरून राज्यात वातावरण तापलेले असतांना राज्याच्या गृह विभागाने अनधिकृत भोंग्यांवर कारवाईची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरण्यासाठी इशारा दिलेला असतांनाच आता गृह खाते अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने राज्याचे पोलीस महासंचालक हे सर्व जिल्हा प्रमुख पोलीस अधिकार्‍यांची लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत भोंगा आणि लाऊड स्पीकर संदर्भातील काही निर्णय घेण्यात येणार असून सध्या सर्व मार्गदर्शक सूचनाचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील कोणत्याही धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर हा योग्य परवानीनेच करता येणार आहे. यासंबंधी निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज डीजीपींसोबत एक बैठक होणार आहे. त्यात ते सर्व आढावा घेऊन सर्व पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना याबाबत योग्य तो निर्देश देणार आहेत.राज्यभर भोंग्यांवरून राजकारण तापलं असताना नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांनी सर्व भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता राज्याच्या गृहखात्यानेही या प्रकरणावर ठोस पावलं उचलली आहेत. त्यामुळे सर्व धर्मियांना भोंगा किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य असणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!