भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज ठाकरेंची भोंग्या विषयी मोठी मोहीम,भोंग्यांचा विषय कायमचा संपवणार!

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे. माझं पत्र तुम्ही राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून केलं आहे. यापूर्वीच राज ठाकरे यांनी आपले पत्र जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावे अन्यथा त्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे अंमलबजावणी केली होती. यानंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका कायम ठेवून स्वाक्षरी मोहिम सुरु केली होती. तसेच आता प्रत्येक घरापर्यंत पत्र देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले .

मशिदींवरील भोंग्यांविषयी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी एक पत्रक जारी करुन कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका कायम ठेवली असून राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. तसेच हा धार्मिक विषय नाही तर सामाजिक असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. भोंगा या विषयाकडे धार्मिक म्हणून न पाहता सामाजिक विषय म्हणून पाहावे, असे सामाजिक विषय खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. असेही राज ठाकरे यांनी यापूर्वी म्हटलं आहे.

तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!