भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

विधानसभा पोटनिवडणुकी बाबत राज ठाकरेंची मोठी भूमिका, भाजपलाही आवाहन

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप आमनेसामने आहेत. या निवडणुकीत आधीच उद्धव ठाकरे यांना सीपीआयसह, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रक काढून या निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहेत. तसेच भाजपलाही उमेदवार न देण्याचं आवाहन केलं. राज ठाकरे म्हणाले की, मी एखाद्या आमदाराचं निधन झाल्यानंतर त्या मतदार संघात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतो. तसे करणे म्हणजे त्या दिवंगत लोकप्रतिनीधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अस मला वाटतं. त्यामुळे आपणही तसच करावं, अस आवाहन राज ठाकरे यांनी भाजपला केलं आहे. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रक काढलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!