भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

रक्षाबंधन ; ग्रहांचा अद्भुत मेळा, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? या तीन राशींसाठी ‘अच्छे दिन’

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात रक्षाबंधन सणाचं विशेष महत्त्व आहे. या वर्षी मात्र अधिक श्रावणासोबत पौर्णिमा तिथी ३० ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट असे दोन दिवस पौर्णिमा तिथी पडली आहे. असं असताना शेकडो वर्षानंतर या दिवशी ग्रहांची स्थितीही वेगळी घडून आली आहे. शनि आणि गुरु हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह आपल्या स्वराशीत विराजमान आहे. गुरु मेष राशीत वक्री, तर शनि कुंभ राशीत वक्री असणार आहे. त्याचबरोबर ३० ऑगस्टला रात्री ८ वाजून ४६ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र असेल आणि त्यानंतर शतभिषा नक्षत्राला सुरुवात होईल. हे नक्षत्र ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल. शनि शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात विराजमान असेल तर दुसरीकडे, ग्रहांचा राजा सूर्यही स्वरास असलेल्या सिंह राशीत असेल. याच राशीत बुध ग्रह वक्री अवस्थेत असेल. त्यामुळे बुधादित्य योग जुळून येणार आहे. त्यामुळे ग्रहांची अशी तीन राशींच्या जातकांसाठी फलदायी ठरणार आहे.

या तीन राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीत गुरु ग्रह वक्री अवस्थेत असल्याने जातकांना त्याचा फायदा होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तसेच नवी कामं हाती पडतील. त्यामुळे उद्योगधंद्यात भरभराट दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही संधी चालून येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वाहन किंवा संपत्ती खरेदीचा योग जुळून येईल.

सिंह : या राशीत सूर्य आणि बुधाची युती होत असून बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच सूर्य मघा नक्षत्रात असणार आहे. त्यामुळे जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळताना दिसेल. अडकलेले पैसेही या काळात मिळू शकतात. आरोग्यविषयक तक्रारीही दूर होतील.

कुंभ : शनिची ही स्वरास असून यात राशीत शनि वक्री अवस्थेत आहे. त्यामुळे शनिची उत्तम साथ या काळात लाभेल. विदेशात जाण्याचा योग जुळून येईल. तसेच कामाच्या ठिकाणी आपला हुद्दा वाढेल. तसेच नवीन जबाबदाऱ्या पडतील. विविध मार्गातून पैसे येतील अशी स्थिती आहे. वैवाहिक जीवनात काही कारणास्तव वाद होऊ शकतात.

मात्र यंदा ३० ऑगस्टपासून रक्षाबंधन सणाची श्रावण पौर्णिमा सुरू होत असून दिवसभर भाद्रची सावली राहणार आहे. अशा स्थितीत ३० ऑगस्ट रोजी दिवसभरात रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नसेल. ३० ऑगस्ट रोजी भद्रा सकाळी ०९:०२ पर्यंत राहील. अशा परिस्थितीत ३० ऑगस्ट रोजी सकाळी ०९:०२ नंतर राखी बांधता येईल. हिंदू कॅलेंडरनुसार ३१ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेची तारीख संध्याकाळी ०७:०५ पर्यंत राहील आणि या दरम्यान भाद्रची सावली नसेल. या कारणास्तव ३१ ऑगस्टला सकाळी लवकर राखी बांधणे शुभ राहील.


रक्षाबंधन २०२३ शुभ मुहूर्त
रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा तारीख: ३० ऑगस्ट २०२३
राखी बांधण्याची वेळ: ३० ऑगस्ट २०२३ सकाळी ०९.०३ नंतर
रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा तारीख संपेल – ३१ ऑगस्ट सकाळी ०७ :०५ वाजता
रक्षाबंधन भाद्र समाप्ती वेळ: ३० ऑगस्ट २०२३ रात्री ०९:०३ वाजता
रक्षा बंधन भाद्र पूंछ: ३० ऑगस्ट संध्याकाळी ०५:३० ते ०६:३१ पर्यंत
रक्षाबंधन भाद्र मुख: ३० ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ०६:३१ ते रात्री ०८:११

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!