भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

मदरशांमध्येही शिकवले जाणार रामायण, या निर्णयाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अयोध्या मध्ये राम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर संपूर्ण देश राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले, त्या मुळे देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, आता उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकवले जाणार आहे. याबाबत उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, वक्त बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या ११७ मदरशांमध्ये आम्ही मुलांना संस्कृत शिकवू आणि मुलांना रामायणाचे धडेही शिकवू जेणे करून मुले त्यांच्या संस्कृतीशी जोडली जातील. त्यांना त्यांच्या इतिहासाचे भान असले पाहिजे. या मुलांना संस्कृतबरोबरच वेद, पुराण, रामायणही शिकता येईल. याआधी उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मुलांना संस्कृत शिकवण्याचीही चर्चा होती, त्याला मुस्लिम मौलानांकडून तीव्र विरोध झाला होता. मात्र आता या प्रकरणात आणखी एक पाऊल पुढे टाकत मदरशांमध्ये रामायण शिकवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मदरसा बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घोषणा केली आहे की बोर्डाच्या अंतर्गत शिकणाऱ्या ११७ मदरशांमध्ये मुलांना रामायणI देखील शिकवले जाईल.

मदरशांमध्ये रामायण शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून श्रीरामाच्या चारित्र्याची ओळख करून दिली जाणार आहे.यापूर्वी शादाब शम्स यांनी सांगितले होते की, आतापासून मदरशांमध्येही संस्कृतचे शिक्षण दिले जाईल, तर मदरसा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. काझमी यांनी मदरशांमध्ये मुलांना वेदांचे ज्ञान देण्याबाबतही सांगितले होते. या विधानांना मोठा विरोध झाला असला तरी आता मंडळाकडून रामायण शिकविण्याची चर्चा सुरू झाली आहे.

विरोध होत असला तरी, या निर्णयाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये रामायण शिकवण्यामागे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांचा विश्वास आहे की मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. मुलांना श्रीरामचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. शादाब शम्स यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणही तापले आहे. या निर्णयाबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, तर मदरशांमध्ये रामायण नक्कीच शिकवले जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाला विरोध होत असला तरी, या निर्णयाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!