व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात, तर घरगुती गॅस सिलेंदरच्या दरात…..
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 2023 रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरचे दर 91 रुपये 50 पैशांनी कमी केले आहेत. ही कपात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंदरच्या दरात कोणतेहे बदल झालेले नाहीत, ते जुन्या दरांतच उपलब्ध आहेत.तर घरगुती गॅस सिलेंदरच्या दरात कधी कपात होईल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. 91.50 रुपयांच्या कपातीनंतर मुंबईसह संपूर्ण देशात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे.
पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यात बदल करतात. दर कपातीनंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कोणत्या शहरात किती आहेत हे जाणून घेऊया?
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (19 किलो)7
दिल्ली – 2028 रुपये
कोलकाता – 2132 रुपये
मुंबई – 1980 रुपये
चेन्नई – 2190.50 रुपये
मार्चमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 350.50 रुपयांनी वाढ
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर वर्षभरात कमी-जास्त होत आहेत. मागील वर्षी याच दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 2022 रोजी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचा दर 2,253 रुपये होता. आज तो 2028 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात केवळ 225 रुपयांची कपात झाली आहे. ही 1 मार्च 2023 रोजी एका झटक्यात व्यावसायिक दरात 350 रुपयांनी वाढ झाली होती.