भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

निर्बंध अटळ! रुग्णांमध्ये नवीन व्हायरसची लक्षणे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा काही महिन्यानंतर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर,पनवेल, पुणे व रायगड शहरांमध्ये कोरोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. तीन लाटा येऊन गेल्यानंतरही राज्यातील एक कोटी नऊ लाख व्यक्तींनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर पावणेतीन कोटी व्यक्तींनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नाही. त्यात १२ ते १८ वयोगटातील सर्वाधिक तरूण असल्याची बाब समोर आली आहे. त्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून कोरोनाला रोखण्यासाठी संबंधित शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नगर, उस्मानाबाद, वाशिम, जालना, यवतमाळ, लातूर, बुलडाणा, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली, नांदेड, बीड, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अजूनही ३० ते ४८ टक्के व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. तसेच १२ ते १४ वयोगटातील १७ लाख, १५ ते १८ वयोगटातील २१ लाख तरूणांनी आणि १८ वर्षांवरील ७० लाख व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. दुसरीकडे अडीच कोटी व्यक्ती दुसऱ्या डोससाठी आलेच नाहीत. कोरोना व्हायरस हा सातत्याने नवनवीन स्वरूपात येत असून लस न घेतलेल्यांना त्याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे आता गर्दीच्या ठिकाणी सर्वांना मास्क सक्ती, गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लागू हेातील. परजिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांना दोन्ही डोस, बुस्टर डोस बंधनकारक केला जाऊ शकतो, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिकांनी ना मास्क वापरला ना लस घेतली.

मागील चार दिवसांत राज्यात तीन हजार ९७१ रुग्ण वाढले आहेत. त्यांच्यात नवीन व्हायरस ची लक्षणे आढळली आहेत. पण, त्यातील ८० टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरु असून रुग्णालयातील बहुतेक रुग्णांना तीव्र स्वरुपाच लक्षणे नाहीत, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी दिली. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या साडेपाच हजारांपर्यंत आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!