खडबळजनक ; ईडी च्या तावडीतून सुटका हवीय, १५ कोटी द्या, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पत्नीला फोन
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा । राजकीय वर्तुळात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीये. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीकडून तोतया ईडी अधिकाऱ्यांनी १५ कोटी रुपयांची खंडणी मागीतली आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल भोसले यांना सोडवण्याच्या नावाखाली ही खंडणी मागण्यात आल्याचे समजतंय.
खंडणीसाठी ईडीच्या बनावट लेटरहेडचा आणि ओळखपत्राचा वापर करण्यात आला होता. तसेच अनोळखी नंबरवरून अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा यांना खंडणीबाबत काही मॅसेजेस आले होते. शिवाजीराव भोसले बँक घोटाळाप्रकरणी अनिल भोसले सध्या अटकेत आहेत. वरळी पोलीस ठाण्यात अनोळखी तोतया इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत आहेत. २५ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना या प्रकरणी ईडीने ताब्यात घेतलंय. अनिल भोसलेंनी बँकेत चेअरमन आणि संचालक पदी कार्यरत असताना ७१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.