भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिंदें शिवसेनेच्या 11 संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर,ही आहेत नावे..

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुका जाहीर होऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु अजूनही महायुतीमधील शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती मिळाली असून शिवसेनेची संभाव्य यादीही समोर आली आहे.

भाजपने आधीच 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अखेरीस आता शिवसेनेतून 11 उमेदवारांची नावं निश्चित झाली आहे. यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये डॉ.श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्याचं ठरलं असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी

1) रामटेक – राजू पारवे
2) बुलढाणा – प्रतापराव जाधव
3) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
4) हिंगोली – हेमंत पाटील
5) कोल्हापूर – संजय मंडलिक
6) हातकंणगले – धैर्यशील माने
7) नाशिक- हेमंत गोडसे
8) मावळ -श्रीरंग बारणे
9) शिर्डी – सदाशिव लोखंडे
10) दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे
11) कल्याण-डोंबिवली – डॅा. श्रीकांत शिंदेअजूनही काही मतदारसंघातील उमेदवारांची चर्चा अजून सुरू आहे. यामध्ये..

अजूनही काही मतदारसंघातील उमेदवारांची चर्चा अजून सुरू आहे. यामध्ये..

12) ठाणे – (रवी फाटक यांच्या नावाची चर्चा सुरू)
13) दक्षिण मुंबई- (यशवंत जाधव यांच्या नावाची सुरू आहे)
14) उत्तर पश्चिम – ( कलाकारांची चाचपणी सुरू )
15) छत्रपती संभाजी नगर ( उमेदवारांशी चर्चा सुरू आहे.)

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. संध्याकाळी 5 वाजता महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 48 ही जागेवरील उमेदवार घोषित करणार असल्याचं सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!