भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराष्ट्रीय

मोठी बातमी : राहुल गांधींवर महिला खासदाराचा गंभीर आरोप, कारवाईची मागणी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मणिपूर हिंसाचारावरून लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज सभागृहात चर्चा करण्यात येत आहे. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली मतं मांडली. यावेळी सभागृहात बोलताना, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधी या सभागृहात भाषण करताना पंतप्रधान मोदी यांची तुलना रावणाशी केली. मोदी मणिपूरच्या जनतेचा आवाज ऐकत नाहीत, ते फक्त अदानी आणि अमित शहा या दोन जणांचचं ऐकतात, सरकार संपूर्ण देश पेटवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींच्या वक्तव्यावर पलटवार करताना, स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणजे भारत नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं. इतकचं नाही तर काँग्रेस घराण्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या नेत्यांच्या चुकीच्या वक्तव्यांचा विरोध करून दाखवावा. तसंच, काँग्रेसचा इतिहास हा रक्तानं माखलेला आहे, असं म्हणत मंत्री इराणी या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच, अदानींवरून मोदी सरकारला काँग्रेस वारंवार प्रश्न विचारत असतं, त्याचाही इराणी यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसनं अदानींना दिलेल्या कंत्राटांची, कर्जाची यादीच त्यांनी सभागृहात वाचून दाखवली.

तसंच, आरोप केलाय की, भाषण संपवून संसदेबाहेर जाताना राहुल गांधी यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किस केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे. भाषण संपल्यानंतर त्यांनी असभ्य वर्तन केलं. त्यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, असा आरोपही स्मृती इराणी यांनी केला. यातून राहुल गांधींच्या कुटुंबाचे संस्कार दिसले, अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली आहे.

तसंच, भाजप खासदार पूनम महाजन यांनीही राहुल गांधी यांच्या वर्तनावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी केलेलं वर्तन असंसदीय असून आम्ही त्याचा विरोध करतो, याची तक्रार अध्यक्षांकडे करणार असल्याचं सांगत महिला खासदारांच्या एका गटानं लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर कारवाई होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!