महाराष्ट्रराजकीय

लोकसभेच्या पूर्ण ४८ जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी ; शिंदे शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुका लावा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं वक्तव्य केलं आहे. यावर शिंदे शिवसेनेतील आमदार मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवावी.म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. ते आयत्या मतांवर निवडून आले आहेत. सकाळी ते टिव्हीवर बोलायला आले की, लोकं चॅनल बदलतात. आता संजय राऊत यांचा लोकं तिरस्कार करत आहेत. २०२४ मध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ, तेव्हा युतीच सरकार येणार आणि एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असं संदीपान भुमरे म्हणाले. यानंतर आता भाजपच्या ४८ जागांच्या आढाव्यावरून संदीपान भुमरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. लोकसभेच्या ४८ पैकी ४८ जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी आहे. तर भाजपच्या ४८ जागांच्या आढाव्यावरून शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी भाष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!