भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा ओरिजनल पत्रकार संघातर्फे पत्रकारास दिलेल्या धमकीचा तीव्र निषेध…

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतच्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन करण्यासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार यांचे परवानगीने तसेच पोलीस निरीक्षकांनीही परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने,खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे का? जर दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिली.

तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतरही यावल येथील एका पोलिसांने पत्रकारास दिलेल्या धमकीबद्दल आज सावदा ओरिजनल पत्रकार संघ सावदा,ता.रावेर तर्फे सावदा येथील सपोनि देविदास इंगोले यांना निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी ओरिजनल पत्रकार संघ सावदा चे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सचिव राज चौधरी, सदस्य दीपक श्रावगे, प्रदिप कुळकर्णी, कविता सकळकळे, संतोष परदेशी, रवींद्र महाजन, अनिल इंगळे, देवेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!