भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेचा भाजपला पाठिंबा, काँग्रेस नाराज,आघाडीत धुसफूस

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करत आम्ही कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेत नाही असंही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने महाराष्ट्र काँग्रेसने शिवसेनेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याची चिन्हं निर्माण झाले असून महाविकास आघाडी धोक्यात आली की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रपती पदाची निवडणूक ही ,स्त्री, पुरूष, आदिवासी, बिगर आदिवासी असा हा लढा नसून संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा लढा आहे. संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे पण तरीही शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? असा सवाल काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये धुसफूस पुन्हा सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे.

“शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचं कारण सांगितलं आहे पण त्यामागची शिवसेनेची खरी भूमिका शिवसेनेलाच माहिती आहे. त्याबद्दल आम्ही काय सांगणार?” असं थोरात म्हणाले आहेत. ज्या भाजपने संविधानाचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार पाडलं त्या भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देत असेल तर काय बोलावं? भाजपने शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे आणि त्याच शिवसेनेने भाजपला पाठिंबा देणे हे अनाकलनीय आहे असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेने आज बैठक घेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे आघाडीतील मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!