धक्कादायक ; “या” ठिकाणी विकलं जातंय चिकन म्हणून कबुतराचं मांस
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एक किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रेस्तराँमध्ये चिकन म्हणून कबुतराचं मांसाच्या डिश ग्राहकांना दिल्या जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबईतील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किंग सर्कल या माटुंगा ईस्ट येथील नरोत्तम निवास सहकारी गृहसंस्था या सोसायटीत राहणाऱ्या अभिषेक सावंत आणि इतर सात जणांना अटक करण्यात आली आहे. या आठ जणांविरोधात एकानं पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत म्हटलं की, नरोत्तम निवास सोसायटीच्या टेरेसवर यावर्षी मार्च महिन्यात सावंत यानं कबुतरांचे पिंजरे बसवले आहेत.या पिंजऱ्यातील कबुतरांची चांगली वाढ झाल्यानंतर तो त्यांना कापून त्यांचं मांस सोसायटचीच्या खालीच असलेल्या हॉटेल आणि बिअर बारमध्ये विकत होता. नंतर या रेस्तराँमध्ये येणाऱ्या ग्राहकांना हे मांस चिकनच्या डिश म्हणून सर्व्ह केलं जात होतं. सावंत याच्या या प्रकाराची सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती होती पण ते यावर मौन बाळगून होते.
याप्रकरणी सावंतसह इतर सात जणांविरोधात पोलिसांनी प्राणी हत्येच्या कलम ४२८ आणि गन्हेगारी कृत्यांसाठी कलम ४४७ अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी जवान हरेश गगलानी यांनी पोलिसांत तक्रार दिली. गगलानी हे याच सोसायटीत रहायला आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या आठ जणांपैकी एकजण राजकीय व्यक्तीचा मुलगा आहे. पण सोसायटीच्या सभासदांनी गगलानी यांच्यावरच आरोप केले असून ही व्यक्ती वारंवार खोटे आरोप करत असून त्यांनी आत्तापर्यंत ३४ तक्रारी दाखल केल्या आहेत. पण याबाबत अद्याप काहीही घडलेलं नाही. त्यामुळं या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी आणि त्यातील सत्य समोर येऊ द्या, अशी भूमिकाही या सभासदांनी घेतली आहे. दरम्यान, हॉटेल मालकानं देखील हा आरोप फेटाळून लावला आहे.