भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आ.एकनाथ खडसे यांची विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लागणार? ठाकरे गटाकडून परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असून आता शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेळली जाणार आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेती विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. ठाकरे गटातून मनीषा कायंदे शिंदे गटात आल्या आहे. त्या मुळे ठाकरे गटाची संख्या कमी झाली आहे त्या मुळे मविआमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली.

अमोल मिटकरी यांनी दावा करत केली मागणी
ठाकरे गटाच्या मनिषा कायंदे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी झाली. आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार असल्याचे वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही केले आहे. १०० टक्के विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करू, असे ते म्हणाले.

विरोधी पक्ष नेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं
विधान परिषदेत संख्या आमची जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं अशी आमची मागणी असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. २०१८ साली शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या आता ठाकरे गटातून शिंदे गटाकडे गेल्या आहे.

निवडीपासून होती नाराजी
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून राजकारण पेटले होते. अंबादास दानवे यांनी निवडीचे पत्र दिल्यामुळे काँग्रेस अन् राष्ट्रवादी नाराज होते. यामध्ये त्यावेळी काँग्रेसनेही तर टोकाचीच भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी शिवसेनेने इतर पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे होते, म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे २४, शिवसेना १२ (दोन्ही गट) तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १० सदस्या आहेत. तर इतर पक्षांचे सात सदस्य आहेत. विधान परिषदेत १५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने केलेला दावा मान्य करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!