….तर पुढचा मुख्यमंत्री कोण? बंद दारा आड चर्चा,अमित शहांनी काय सांगितलं शिंदेंना?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रविवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपच्या नेतृत्वानं आगामी निवडणुकीसाठी विश्वास व्यक्त केलाय. अमित शाह रविवारी, एका दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. याचवेळी बंद दाराआड महत्वपूर्ण बैठक भाजपचे आमदार पराग अळवणींच्या घरी झाली. जवळपास एक तास अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली.
आगामी सर्व निवडणुकाबमुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात
लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. येत्या १५ दिवसांत सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातला निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाहांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने आला तर पुढची वाटचाल कशी असावी? सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात गेल्यास काय करायचं? १६ आमदार अपात्र झाले तरी बहुमत सरकारकडे असणारच, त्यामुळे तर पुढचा मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट