भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

ऑनलाईन,ऑफलाईन परीक्षा संदर्भात उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच वक्तव्य…

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा हा विद्यार्थ्यांचा सध्या सगळ्यात जवळचा प्रश्न आहे. आता आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जायचं आहे. महाराष्ट्र शासनाने देखील या निर्णयाला संमती दिली आहे. आता यापुढे राज्यात ऑफलाईनच परीक्षा होणार असल्याची माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली . आपण अभ्यास कितपत करू शकतो असा विद्यार्थांच्या मनात न्यूनगंड होता.त्यामुळे त्यांना परीक्षेआधी प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑफलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली आहे. असेही सामंत या इ सांगितले.

12 वी आणि सीईटीचे 50 टक्के गुण मेरीटसाठी ग्राह्य धरणार कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे ते 12 वीच्या अभ्यासाक्रमाकडे दुर्लक्ष करून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेत आहोत. याआधी पृथ्वीराज चव्हण मुंत्र्यमंत्री असताना हा प्रयोग झालेला होता. आता हा प्रयोग पुन्हा करणार आहोत. मेरीटसाठी 12 वी आणि सीईटीचे 50 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि 12 वीच्या गुणांना महत्त्व देण्यात येणार आहे.

पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत.आंतराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे विद्यापीठांना सांगण्यात आले आहे. तसेच निकालदेखील लवकरात लवकर लागावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करणं आमची जबाबदारी आहे. देशातील अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम मराठीत सुरू केला आहे. इंजिनिअरिंगचा मराठी भाषेतला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी चांगल्याप्रकारे स्वीकारला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!