अजबच ; बहिणीनं लावलं भावासोबतच लग्न, 30 वर्षाची बहीण तर 60 वर्षाचा भाऊ
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। समाजातील नातेसंबंधाची परिभाषा बदलत चाली आहे. नातेसंबंधांना मार्डन युगात तडा जाताना दिसत आहे. सून आणि सासऱ्यांचं लग्न, वडील आणि मुलीचं लग्न आणि आता हे काय बहीण भावाचं लग्न… काय म्हणावं याला! भावाने बहिणीसोबतच उरकलं लग्न
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात…वडील आणि मुलीच्या नात्यानंतर जर कुठलं नातं हे पवित्र असेल तर ते बहीण भावाचं. मोठी बहीण ही लहान भावड्यांसाठी मायची सावली असते. तर मोठा भाऊ म्हणजे वडिलाची छाया…पण आजकाल प्रेमाची परीभाषाचं बदलली आहे. आज सून सासरे, वडील मुलगी आणि आता बहीण भाऊ यांचा लग्नाचे प्रकरण समोर येतं आहेत.
हा तर नातेसंबंधांना धक्का!
आज पती पत्नी म्हणून जगत असलेले हे दोघे लग्नापूर्वी भाऊ बहीण होते. ही विचित्र लव्ह स्टोरी ऐकाना अवाक् करत आहेत. झालं असं की, एकदा त्या महिलेचा चुलत भाऊ तिच्या घरी आला. वडिलांनी दोघांची ओळख करुन दिली. मुलगी पाहता क्षणीच त्या व्यक्तीच्या म्हणजेच भावाच्या प्रेमातच पडली.
30 वर्षाची वधू अन् 60 वर्षांचा वर
जेव्हा बहीण तिच्या भावाला भेटली तेव्हा ती 30 वर्षाची होती तर भाऊ हा 60 वर्षांचा होता. आज काल लग्न करताना रंग, जात आणि वय देखील पाहिलं जातं नाही. या दोघांमध्ये तब्बल 29 वर्षांचे अंतर आहे. चार दिवसाच्या भेटीमध्ये या बहीण भावाच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. या दोघांनी 3 महिन्यातच लग्नाचा निर्णय घेतला.
आज त्यांचा लग्नाला 6 वर्षे झाली आहेत. समाजातून टोमणे ऐकावे लागतात!
हे कपल आहे ब्राझीलमधील…तिथे आजही त्या मुलीला समाजातून टोमणे ऐकावे लागतात.