परीक्षेच्या एकसमानतेसाठी राज्यातील विद्यापीठांचे विद्यार्थी उच्च न्यायालयात
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठांतील काही विद्यार्थ्यांनी मिळून परीक्षेच्या पद्धतीत एकसमानतेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून याचिका दाखल केली आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
राज्यातील विद्यापीठांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या आहेत तर काही विद्यापीठांच्या परीक्षा नियोजित आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या जात असल्याने परीक्षा घेताना एक समानता राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना एकसमान न्याय मिळालेला नाही. याविरोधात ही याचिका महाराष्ट्रातील राज्यातील विविध विद्यापीठातील ११ विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.