भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालाचा संस्पेन्स कायम!

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी कायदेशीर तथ्य आणि सत्तांतराच्या घटनाक्रमावर जोरदार युक्तिवाद केला. कोर्टाने आता याबाबतचा निर्णय राखून ठेवला असून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय कधीही निर्णय देणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे प्रकरण ७ जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याचा सस्पेन्सही कायम आहे. त्यामुळे कोर्ट थेट निकाल देणार की हे प्रकरण ७ जणांच्या खंडपीठाकडे पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर गेल्या आठ महिन्यांपासून युक्तिवाद सुरू होता. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!