सर्वात मोठी बातमी ! सकाळी पहाटेच राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरावर ईडीची धाड
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री याच्या घरावर आज सकाळी मोठया पहाटेच ईडीने धाड टाकल्याने खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड टाकली. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे.
चार ते पाच ईडी अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा धाड टाकली. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर ईडीने दुसऱ्यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.