भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आतांची सर्वात मोठी बातमी : शिंदे की ठाकरे सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्राच्या दृष्टीने आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिले आहेत. मात्र आज संध्याकाळी प्रकरण लिस्ट होतं का पाहावं लागेल.

सत्तासंघर्षाचा निकाल उद्या किंवा परवा म्हणजेच ११ किंवा १२ मेला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यघटनेचे अभ्यासक याविषयी आपलं मत मांडत आहेत. आता सूत्रांच्या हवाल्याने उद्या हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

काही महत्वाचे प्रश्न
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधिमंडळातच होईल, असं कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. पण हा निर्णय कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार? विधानसभेचे तत्कालिन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ की सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर? याबाबत सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. यावर उद्या निकालाची शक्यता आहे.

‘या’ नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार
एकनाथ शिंदे

अब्दुल सत्तार

संदिपान भुमरे

संजय शिरसाट

तानाजी सावंत

यामिनी जाधव

चिमणराव पाटील

भरत गोगावले

लता सोनावणे

प्रकाश सुर्वे

बालाजी किणीकर

अनिल बाबर

महेश शिंदे

संजय रायमुलकर

रमेश बोरणारे

बालाजी कल्याणकर

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मत काय?
येत्या दोन दिवसात निकाल नाही लागला तर ते लोकशाहीसाठी काळा दिवस असेल. अक्षम्य गोष्ट सुप्रीम कोर्टकडून होईल. रकार घटनाबाह्य आहे की नाही, हे दोन महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने ठरवायला हवं होतं. उध्दव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. दहाव्या सुचीनुसार १६ आमदार अपात्र व्हायलाच हवेत, असं उल्हास बापट म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही राजीनामा देऊ शकतात. सुप्रीम कोर्ट अपत्रातेचा निर्णय घेणार नाही. ते विधासनभा अध्यक्षांकडे पाठवतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल विधानसभा अध्यक्षावर बंधनकारक असेल, असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे.

उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनीही राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलंय. दोन दिवसात हा निकाल येऊ शकतो, असं उज्वल निकम म्हणाले आहेत. या दोन दिवसात निकाल न आल्यास निवृत्त न्यायाधिशांच्या जागी नवे न्यायाधिश असतील. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी ८ ते ९ याचिकांवर सुनावणी होतेय. त्याचा निकाल लवकरच लागेल, असं निकम म्हणाले आहेत.

असीम सरोदे यांची प्रतिक्रिया
तर कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनीही राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ११ किंवा १२ मेला शिवसेनेतील पेच सुटण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केलीय. सत्तासंघर्षाचा प्रश्न न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्याची जास्त शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे, असं असीम सरोदे म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!