भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्यासामाजिक

बजेट कोलमडलं ; गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ, सिलेंडरची किंमत 1000 पार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एक हजार रुपयांच्या जवळ पोहचलेले गॅस सिलिंडर ने आता हजारांचा आकडा पार केला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असतानाच आता पुन्हा एक झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे आता भारतात घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पार पोहोचला आहे. त्यासोबतच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे.

आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 1000 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईत 1018.5 रुपये झाला आहे.

देशात महागाई वाढत असतानाच याच मे महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या पूर्वी 7 मे रोजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ करण्यात आली असल्याने महागाईचा भडका उडाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!