भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

युतीत घमासान, आणि “ती ” जाहिरात, भाजपलाच इशारा?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेच्या ४० आमदारांमुळे भाजप सत्तेत आहे असं किर्तीकर म्हणाले. गजानन कीर्तिकर यांनी भाजपला इशाराच दिला. कल्याणमधील भाजपचे काही नेते युतीत खडे टाकताय, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला होता. तर युतीत घमासान का सुरू झालं….देशात मोदी आणि राज्यात शिंदे हे ठासून सांगणारी जाहीरात वृत्तपत्रात येण्याआधी गजानन किर्तीकर यांनी भाजपला इशारा दिला आणि शिंदेच्या आमदारांची ताकदही तितकीच महत्त्वाची आहे असे म्हणत किर्तीकरांनी त्यांचा आत्मविश्वासही वाढवला.

गजानन किर्तीकर म्हणाले, शिवेसनेचे ४० आमदार एकत्र आल्यामुळेचे आज भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली. त्यामुळे आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे. ४० आमदार सोबत होते म्हणूनच महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. असे म्हणत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढवला आहे.

यावर भाजपच्या प्रविण दरेकरांनी उत्तर दिलंय ४० आमदारांनी काय होत नाही, भाजपचे तिप्पट आमदार आहेत. ‘शिवसेनेचे ४० आमदार आणि भाजपच्या आमदार एकत्र आले म्हणून सत्ता आलीये. टाळी एका हाताने वाजत नाही. ताकद आपापसात आजमावण्यापेक्षा विरोधकांनी त्या ताकदीचा धस्का घेतला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही वक्तव्याने शिवसेना – भाजपमध्ये दुरावा निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी’, असा सल्ला दरेकर यांनी गजानन किर्तीकर यांना दिलाय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!