राज्यावर थंडी सोबत अवकाळी पावसाचे संकट, वातावरणातील बदलामुळे शेतीकरी धास्तावला
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात कधी उन्हाळ्यात पाऊस तर कधी हिवाळ्यात पाऊस असा काही वर्षांपासून वातावरणात कधीही अचानक बदल होत आहे .या वर्षी मात्र जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवड्याभरात थंडीचा कडाक्याचा अनुभव मुंबईकरांसह राज्याने घेतला. नाशिक व खान्देशात हाडे गोठवणारी थंडी देखील अनुभवयाला मिळाली. आता गेल्या दोन दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. २७ व २८ जानेवारी रोजी राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD)व्यक्त केला.
पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी त्याद्दष्टिने नियोजन करण्याची गरज आहे. अचानक हा बदल नेमका कशामुळे झाला असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागानं मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हातात आलेला गहू, हरबारा पिकांचे यामुळे नुकसान होणार आहे. कांदा व द्राक्ष पिकांवर वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस पडला तर पिकांचं मोठं नुकसान होण्यची शक्यता आहे.
कडाक्याची पडलेली थंडी अन् त्यानंतर येणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीकरी वर्ग धास्तावला आहे, विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचा गहू व हरभरा पिकांचे नुकसान होणार आहे.