भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षा घेताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।  महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांच्या पदवी पदव्युत्तर परीक्षा या ऑफलाईन पध्दतीने घेण्यावर सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत एक मत झाले. मात्र, या ऑफलाईन परीक्षा मे मध्ये घेण्याऐवजी जून जुलै महिन्यामध्ये घेण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आल्याने या ऑफलाईन परीक्षांचा निकाल ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात जाहीर होईल. त्यामुळे निकालाला लेटमार्क लागण्याची विद्यार्थ्यांना भीती असून इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ शकतात, असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून परीक्षा संदर्भात निर्णय घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन कडून करण्यात आली आहे. 

याआधी राज्यातील अनेक विद्यापीठाने आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा या हायब्रीड मोड मध्ये म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कुणाचा संकट दूर झाल्यानंतर या परीक्षा आता पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने पारंपारिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे.

इतर विद्यापीठात अनेक ठिकाणी सरसकट एकच नियोजन केले जावे व गुणवत्ता सुद्धा समान राहावी यासाठी सर्वत्र ऑफलाइन परीक्षाचा पर्याय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला. शिवाय या परीक्षा घेताना दोन पेपर मध्ये दोन दिवसांचा गॅप, प्रत्येक तासाला पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या परीक्षा दर मे महिन्याच्या बेटी जून-जुलैमध्ये घेण्याचे नियोजन केले जात असेल तर निकाल उशीरा लागू पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात असे मत महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे संस्थापक सिद्धार्थ इंगळे यांनी मांडले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!