भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

कोरोनाचा नवा व्हेरिएंट, राज्यात पुन्हा मास्क सक्ती बद्दल आरोग्यमंत्री म्हणाले…

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा l जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने आता आधीच योग्य ती पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने राज्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेत माहिती देताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुढे म्हणाले की, आतापर्यंत नवीन व्हेरयंटचा एकही राज्यात रुग्ण रेकॉर्डवर नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच मेडिकल यंत्रणा तयारीत आहे. आपल्याकडे कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे आतापर्यंत देशात चार रुग्ण सापडले आहेत. मात्र, राज्यात अजून एकही रुग्ण नाही. जिल्हा आरोग्य केंद्र ते मनपाला टेस्टिंग, ट्रॅकिंगवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागातील जी रिक्त पदे रिक्त आहेत ती भरण्याचे काम सुरू आहे, तसेच ते पुढे म्हणाले की, इतर देशातून जे पर्यटक येत आहे, त्यांची थर्मल चाचणी केली जाणार आहे. त्यात काही दोष असेल तर त्यांना आयसोलेशन करण्याच्या सूचना दिले आहेत. उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्यासोबत या संदर्भात बैठक होणार आहे. त्यानंतर मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!