उन्हाचा तडाखा वाढणार, महाराष्ट्रातून अवकाळी पावसाचा काढता पाय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार असून सोमवारी तापमान 31 ते 36 अंशांच्या दरम्यान असेल, तर आकाश निरभ्र राहील. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वगळता देशातील इतर भागांमध्ये उन्हाचा दाह हळुहळू वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या काळात कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातून अवकाळी काढता पाय घेणार असून, कमाल तापमानात 4 अंशांची वाढ होऊ शकते.
मुंबई, पालघर आणि कोकणात किनारपट्टी भागामध्ये उन्हाचा तडाखा दुपारच्या वेळेस आणखी तीव्र होताना दिसणार आहे. तर, संख्याकाळच्या वेळी या भागात सोसाट्याचे वारेही सुरु शकतात.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात एसक्रीय होणार आहे. ज्यामुळं संपूर्ण उत्तर भारतासह देशातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. हवामान विभागानं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 29 मार्च पासून पश्चिमी झंझावाताचे थेट परिणाम दिसून येणार आहेत. गुरुवार आणि शुक्रवारी देशातील काही भागात पावसाची हजेरी असून, किमान तापमानात घट होणार आहे.