दागिन्यांची हौस लयभारी ; कोरोना असला म्हणून काय झालं, मास्कवरच घातले दागिने
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई (वृत्तसंस्था)। देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम साऱ्यांनीच पाहिले आहेत. या लाटेचा फटका सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला बसला आहे. त्यातच कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्येच सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणं बंधनकारक आहे. त्यातच लग्नसमारंभाबाबतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा संपन्न होणार असून यात मास्क वापरणं आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणं अनिर्वाय आहे.विशेष म्हणजे लग्नकार्यात मास्क घालून वावरणं अनेकांना अशक्य होत असून महिलावर्गाची जास्तच पंचाईत झाली आहे. मास्क घातल्यामुळे दागदागिने वा मेकअप नीट दिसत नसल्यामुळे अनेकजणी नाराज झाल्या आहेत. परंतु, एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे.
लग्नसमारंभात गेल्यावर मास्क घालणं गरजेचं आहे. त्यातच महिलांना दागदागिन्यांचीही तितकीच हौस असते. परंतु, मास्क घातल्यामुळे नाकातली नथ, कानातल्या बुगड्या फारशा नीट दिसत नाहीत. म्हणूनच, एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे. तिने मास्कवर दागिने घातले आहेत. विशेष म्हणजे तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये संबंधित महिलेने चक्क मास्कवर नाकातील नथनी घातली आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.