भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

प्रतिज्ञापत्र दोन्ही बाजूला देणाऱ्या राष्ट्रवादीचे ५ आमदार व एका खासदाराचे नावं आली समोर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले.राष्ट्रवादी चे अजित पवार यांनी वेगळी चूल मांडत राष्ट्रवादि कांग्रेस पक्ष व चिन्हावर दावा ठोकला, या बाबत निवडणूक आयोगा समोर सुनावणी सुरू होती.

अखेर निवडणूक आयोगाच्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादात निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यात राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाने बहुमताचा मुद्दा महत्वाचा मांडला. यावेळी ५ आमदारांनी व एका खासदाराने शरद पवार गट व अजित पवार गट आशा दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दिले होते.

दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणाऱ्या राष्ट्रवादीच्या ५ आमदारांची आणि एका खासदाराचे नाव समोर आली आहेत. यात आमदार चेतन तुपे, किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिले होते.आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला अजित पवार यांचा गटाला प्रतिज्ञापत्र दिले. त्यानंतर पुन्हा शरद पवार गटाला काउंटर प्रतिज्ञापत्र दिले. आमच्याकडून दिशाभूल करून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी केला होता. प्रतिज्ञापत्र शरद पवार यांच्या आदेशाने घेतले जात असल्याची सुरुवातीला माहिती सांगण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आमची दिशाभूल करण्यात आली, असे ते म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!