भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यपाल बदलाची शक्यता? जनतेचे लक्ष हटवण्यासाठी कर्नाटक सीमा प्रश्न, खा. राऊतांचा आरोप

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा सर्व पक्षीय नेते आणि संघटनांनी निषेध केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौर्‍यावर गेले आहे. या दौर्‍यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपाल बदलण्यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली आहे, असा आरोप शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच महाराष्ट्राची जनता शिवरायांचा अवमान अजिबात सहन करणार नाही, दोन दिवसांत याबाबतचे पुढचे पाऊल काय असेल हे सांगितले जाईल, असेही राऊत म्हणाले. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!