सोन्याच्या दरात घसरण सुरुच, सोनं झालं स्वस्त! जाणून घ्या नवे दर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून सोनचांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. बुधवारीसुद्धा सोन्याच्या दरात घसरण दिसली आज सुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरुच असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढलाय.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,250 तर 24 कॅरेट साठी 52,640 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 610 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.