राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे
आता कोणतेही निर्बंध नाहीत आता गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्सहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. तसेच राज्याची आपली परंपरा पुढे न्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून मास्क घालणं ऐच्छिक असल्याची माहिती देखील देण्यात आली .दरम्यान येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवमी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता.
विरोधकांनी यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ एप्रिल अर्थात उद्यापासून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. तसेच मार्च २०२० पासून राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू निर्बंधातून सूट देण्यात आली होती.