भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट, मुसळधार पावसाचा इशारा, तर उष्णतेच्या लाटेचाही अंदाज

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यावर पुन्हा एकदाराज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट अवकाळीचं संकट आलं आहे. हवामान विभागाकडून काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आलं आहे. हवामान विभागनं (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर उस्मानाबाद, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली, या पावसाचा मोठा फटका हा आंबे, काजू आणि इतर फळ झाडांच्या बागांना बसला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवलेला असतानाच दुसरीकडे काही भागात हीट वेव्हचा तडाखा देखील बसत आहे. सोलापुरात 41. 6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असून नाशिकमध्ये 21. 6 अंश सेल्सिअस एवढ कमाल तापमान आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे या जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा देखील सामना करावा लागणार आहे. सध्या मुंबईत दमट वातावरण आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरात आणखी उष्णता वाढणार असून, कमाल तापमान 34 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.अकोल्यात आज पावसासोबतच उष्णतेच्या लाटेचाही अंदाज आहे. तर सोलापूर आणि नांदेडमध्ये रात्रीच्या वेळी उकाडा प्रचंड वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!