भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

धनुष्यबाण चिन्हा साठी रस्सीखेच,१६ आमदारांच्या पात्रतेचा वाद, आज फैसला होणार?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि १६ आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे.  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण  चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. 

शिंदे सरकारचं काय होणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. कारण शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजे १४ फ्रेबुवारीला होत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. त्यावर दोन्ही गटांची सुप्रीम कोर्टात याचिका केल्या आहेत.  

तसेच १६ आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरत आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारकीविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिंदेंना घेरायचं, इतर १५ आमदारांना अपात्र ठरवायचं आणि सरकार अल्पमतात आणायचं अशी ठाकरेंची रणनीती आहे. सुप्रीम कोर्टात आज सकाळी १०:३० वाजता यावर सुनावणी होणार आहे. तेव्हा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!